ration-server-down

रास्तभाव धान्य वाटप ज्या आधार प्रणित सार्वजनिक वाटप प्रणाली (AePDS) च्या सर्वर वर चालते तो सर्वर गेल्या 5-6 दिवस काही तांत्रिक कारणांमुळे कधी बंद किंवा अतिशय हळू चालत असल्याने कुठल्याही रेशनकार्ड ची धान्यवाटपासाठी नोंदणी होत नाही आणि ऑफलाईन धान्यवाटपाची परवानगी नसल्याने कुठलाही रास्तभावधान्य दुकानदार तसे धान्य वितरण करू शकत नाही. यामुळे रास्तभावधान्य दुकानांसमोर लांब रांगा दिसत आहेत.

फेब्रुवारी चा महिना येत्या 2 दिवसात संपणार आहे त्यामुळे जनतेला आपले धान्य मिळणार की नाही याबाबतीत संभ्रम आहे. सदर रास्त भाव धान्य दुकांदारांशी आमच्या वार्ताहरांनी संपर्क केल्यावर त्यांनी सांगितले की धान्याचे वितरण वेळेवर होण्यासाठी AePDS चा सर्व्हर लवकरात लवकर सुरू करावा अशी त्यांची शासनाकडून अपेक्षा आहे. सर्वर चालू झाल्यावर ते धान्यवाटप व्यवस्थित रित्या ते पूर्ण करू शकतात. सरकारने आणि शासकीय यंत्रणेने या विषयावर लक्ष तातडीने दिले पाहिजे जेणेकरून जनतेला त्यांच्या हक्काचे धान्य मिळेल.