आजपासून अनेक गोष्टींबाबत नवे नियम लागू होत असून याचा परिणाम सर्वसामान्यांच्या जीवनावर होण्याची शक्यता आहे. विमान प्रवास, आरोग्य विमा, गॅस सिलिंंडर, मिठाईसह अनेक गोष्टींमध्ये महत्वाचे बदल होणार आहेत. याचा परिणाम तुमच्या दैनंदिन जीवनावर होणार असल्यामुळे याची माहिती असणे आवश्यक आहे. वाहन परवाना, आरोग्य विमा आजपासून वाहन परवाना आणि गाडीच्या रजिस्ट्रेशनची ओरिजिनल कॉपी सोबत ठेवण्याची आवश्यकता […]
Category: ताज्या बातम्या
पनवेल: धावत्या लोकलमधून ढकलून पत्नीची हत्या; पतीला अटक
पनवेल: चारित्र्याच्या संशयावरून पत्नीला मारहाण करत तिला खांदेश्वर आणि मानसरोवर रेल्वे स्थानकादरम्यान धावत्या लोकलमधून बाहेर ढकलून देऊन तिची हत्या करणाऱ्या विशाल मनोज माने (२२) या पतीला पनवेल रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. १७ सप्टेंबरला सायंकाळी दोघे पती-पत्नी पनवेल येथून मानखुर्द येथे जाताना ही घटना घडली होती. आरोपी विशाल हा मानखुर्द पुलाखाली फूटपाथवर असलेल्या झोपडपट्टीत राहण्यास […]
स्वदेस फॉउंडेशन मार्फत जागतिक हृदय दिवस साजरा पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांचा विशेष सहभाग
आज दि.29 सप्टेंबर या जागतिक हृदय दिवसाचे औचित्य साधून स्वदेस फाऊंडेशन तर्फे हृदय शस्रक्रिया झालेल्या मुलांसोबत तसेच पालकांसोबत डिजिटल झूम अँप च्या माध्यमातून संवाद साधण्यात आला. या कार्यक्रमासाठी रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री कु.आदिती तटकरे, स्वदेस फौंडेशनचे संस्थापक रॉनी स्क्रूवाला, झरीना स्क्रूवाला, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुहास माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर […]
प्रादेशिक परिवहन कार्यालय पेण – मोटार वाहन निरीक्षकांचा ऑक्टोबर महिन्याचा शिबीर कार्यक्रम जाहीर
उप प्रादेशिक परिवहन कार्यालय पेण कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षकांचा ऑक्टोबर २०२० महिन्याचा शिबीर कार्यक्रम जाहीर झाला असून शिबीर कार्यक्रम पुढीलप्रमाणे- तालुका दिवस एकूण दिवस महाड सोमवार दि. ०५ ऑक्टोबर, १२ ऑक्टोबर व १९ ऑक्टोबर ३ श्रीवर्धन मंगळवार दि.०६ ऑक्टोबर व दि.२० आक्टोबर २ माणगाव बुधवार दि. ०७ ऑक्टोबर व दि.२१ ऑक्टोबर २ अलिबाग शुक्रवार दि.०९ ऑक्टोबर, […]
राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व आगारांमधून पास, स्मार्ट कार्ड कार्यप्रणाली, नोंदणीकरण, नूतनीकरण प्रक्रिया सुरु
राज्य परिवहन महामंडळाची जिल्हा अंतर्गत व आंतरजिल्हा प्रवासी वाहतूक सुरु करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व आगारांमधून विद्यार्थी पास, ज्येष्ठ नागरिक, मासिक, त्रैमासिक पास, आवडेल तेथे प्रवास पास, स्मार्ट कार्ड कार्यप्रणाली, नोंदणीकरण, नूतनीकरण व टॉपअप अशा सर्व प्रक्रिया सुरु करण्यात आल्या असून स्मार्ट कार्ड नोंदणीकरण पूर्ववत सुरु करण्यात आले आहे. या प्रक्रिया आगारातील बसस्थानकावरील स्मार्ट […]
स्मार्ट ग्राम योजनेअंतर्गत ह्या आहेत रायगड जिल्ह्यातील प्रथम ३ ग्रामपंचायती
रायगड जिल्ह्यामधील ८०९ ग्रामपंचायतींमधून निवड महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास मंत्रालयाच्या माध्यमातून आयोजित केलेल्या स्मार्ट ग्राम योजना २०१८-२०१९ मध्ये पनवेल तालुक्यातील शिवकर ग्रामपंचायतीने जिल्ह्यात प्रखम क्रमांक पटकाविला आहे. रायगड जिल्ह्यामधील १५ तालुक्यांतील ८०९ ग्रामपंचायतीमधून शिवकर ग्रामपंचायतीची निवड झाली असून, शिवकर ग्रामपंचायतीला ५० लाखांचे पारितोषिक मिळणार आहे. या योजनेंतर्गत स्वच्छता, दायित्व, व्यवस्थापन, अपारंपरिक ऊर्जा व पर्यावरण, पारदर्शक व […]
MTDC Resort चे होणार खासगीकरण, हे रिसॉर्ट्स आहेत पहिल्या टप्प्यात
राज्यातील पर्यटन उद्योगाला चालना देण्यासाठी ठाकरे सरकारने MTDC Resort अर्थात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या मालमत्तांचे खासगीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार, पहिल्या टप्प्यात रायगड जिल्ह्यातील माथेरान, महाबळेश्वर, हरिहरेश्वर, तर रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे आणि सिंधुदुर्गातील मिठबाव येथील रिसॉर्टचे खासगीकरण करण्यात येणार आहे. हे रिसॉर्ट ज्या संस्था चालवायला घेतील घेतील त्यांना पर्यटन धोरणानुसार विशिष्ट सवलतीही देण्यात येणार […]
गेट वे ऑफ इंडियाच्या नूतनीकरणासाठी महाराष्ट्र सरकारची योजना
गेट वे ऑफ इंडिया – देशातील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक नव्याने उभारण्याची महाराष्ट्र सरकारची योजना आहे. त्याच्या अपग्रेडेशन आणि नूतनीकरणाच्या योजनेत, राज्य त्या ठिकाणी देशाच्या आर्थिक राजधानीची ओळख देऊ इच्छित आहे. संवर्धनाचे आर्किटेक्ट आभा लांबा यांनी पुनर्वसनासाठी तीन प्रस्ताव तयार केले आहेत. या दुरुस्तीमध्ये स्मारकाचे संवर्धन, पर्यटकांसाठी सुविधा, गर्दी व्यवस्थापन आणि सुरक्षा श्रेणीसुधारणा यांचा […]
खांदा कॉलनी येथील सीकेटी कॉलेज कडे जाणाऱ्या भुयारी मार्गाचे हाइटगेज पडले
खांदा कॉलनी येथील सीकेटी कॉलेज कडे जाणाऱ्या भुयारी मार्गाचे हाइटगेज पडले आहेत. महानगरपालिकेचे आपत्कालीन पथक त्या ठिकाणी पोहोचले असून त्या ठिकाणचा रस्ता दक्षता म्हणून बंद करण्यात आला आहे. पनवेल मधून खांदा कॉलनी आणि सीकेटी महाविद्यलया कडे जाणाऱ्यांसाठी हा रास्ता सोयीचा आहे परंतु महाविद्यालये सध्या बंद असल्याने विद्यार्थाना ह्याचा त्रास होणार नाही परंतु येथून प्रवास करणाऱ्या […]
खालापुरात एटीएम मशीन तोडून २९ लाखांची चोरी
शुक्रवारी पहाटे अज्ञात व्यक्तींच्या गटाने एका तासाच्या आत खालापुरात एटीएम मशीन तोडून २९ लाखांची चोरी केली. या प्रकरणाचा तपास करताना खालापूर पोलिसांनी सांगितले की, ३० लाख रुपये असलेले दुसरे एटीएम तोडण्याचा प्रयत्न या चोरांनी केला पण तो अयशस्वी झाला. शुक्रवारी पहाटे अडीच ते साडेतीन या दरम्यान पेन-खोपोली रोडलगतच्या गोरथन बुद्रुक गावात ही चोरी झाली. त्याचप्रकारे […]