Posted inखालापूरखोपोलीताज्या बातम्यापेण

खालापुरात एटीएम मशीन तोडून २९ लाखांची चोरी

शुक्रवारी पहाटे अज्ञात व्यक्तींच्या गटाने एका तासाच्या आत खालापुरात एटीएम मशीन तोडून २९ लाखांची चोरी केली. या प्रकरणाचा तपास करताना खालापूर पोलिसांनी सांगितले की, ३० लाख रुपये असलेले दुसरे एटीएम तोडण्याचा प्रयत्न या चोरांनी केला पण तो अयशस्वी झाला. शुक्रवारी पहाटे अडीच ते साडेतीन या दरम्यान पेन-खोपोली रोडलगतच्या गोरथन बुद्रुक गावात ही चोरी झाली. त्याचप्रकारे […]

Posted inखालापूरखोपोलीताज्या बातम्यापनवेल

मोरबे धरणात सापडला महिलेचा मृतदेह

पनवेल तालुक्यातील मोरबे धरणात बुधवारी जवळपास ३० वर्ष वयाच्या अज्ञात महिलेचा मृतदेह सापडला. शरीर लोखंडी तारा आणि दोरीने डोक्यापासून पायापर्यंत बांधलेले होते. धरणात शरीर पूर्णपणे बुडविण्यासाठी शरीरावर सिमेंट ब्लॉक बांधलेले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाण्यामुळे शरीरावर फुगलेला असल्याने तो तरंगत येऊन धरणाच्या भिंतीजवळ अडला. पोलिसांना केवळ शरीरावर बांधलेल्या तारा कापण्यास सुमारे ४५ मिनिटे लागली. “मृत्यूचे […]

Posted inखालापूर

आयआरबीकडून पाण्याची चोरी!

खालापूर : कर्जत जलसंपदा विभागाने नुकताच आयआरबी कंपनीला पाणी चोरी प्रकरणी तब्बल ७५ लाख दंड ठोठावला आहे. जलसंपदा विभागाच्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत असून एक्स्प्रेस वेच्या स्थापनेपासून आजतागायतपर्यंत अनधिकृत पाणी उपसा करून पाण्याचा कर न भरल्याने उपसा पंप सील करण्यात आले आहे. मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवर पाताळगंगा नदीपात्रातून दांड वाडी निंबोडे गावाच्या हद्दीतून किलोमीटर […]

Posted inखालापूर

नाढळ पाझर तलावात मातीचा भराव!

खालापूर : राज्यात भीषण पाणीटंचाई असताना रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील नाढळ गावाच्या हद्दीतील तलाव बुजविण्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. चौकजवळील लोधिवली ग्रामपंचायत हद्दीतील असणाऱ्या या पाझर तलावात मातीचा भराव टाकण्याचे काम ग्रामपंचायतीने हाणून पाडले असून, जिल्हा परिषदेच्या मालकीच्या या तलावात अनधिकृत काम करणाऱ्यांविरोधात कारवाईची मागणी होत असताना कर्जत लघु पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने […]