शुक्रवारी पहाटे अज्ञात व्यक्तींच्या गटाने एका तासाच्या आत खालापुरात एटीएम मशीन तोडून २९ लाखांची चोरी केली. या प्रकरणाचा तपास करताना खालापूर पोलिसांनी सांगितले की, ३० लाख रुपये असलेले दुसरे एटीएम तोडण्याचा प्रयत्न या चोरांनी केला पण तो अयशस्वी झाला. शुक्रवारी पहाटे अडीच ते साडेतीन या दरम्यान पेन-खोपोली रोडलगतच्या गोरथन बुद्रुक गावात ही चोरी झाली. त्याचप्रकारे […]
Category: खोपोली
मोरबे धरणात सापडला महिलेचा मृतदेह
पनवेल तालुक्यातील मोरबे धरणात बुधवारी जवळपास ३० वर्ष वयाच्या अज्ञात महिलेचा मृतदेह सापडला. शरीर लोखंडी तारा आणि दोरीने डोक्यापासून पायापर्यंत बांधलेले होते. धरणात शरीर पूर्णपणे बुडविण्यासाठी शरीरावर सिमेंट ब्लॉक बांधलेले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाण्यामुळे शरीरावर फुगलेला असल्याने तो तरंगत येऊन धरणाच्या भिंतीजवळ अडला. पोलिसांना केवळ शरीरावर बांधलेल्या तारा कापण्यास सुमारे ४५ मिनिटे लागली. “मृत्यूचे […]
इंडिया स्टीलची भिंत कोसळून ६ फॉर व्हीलर गाड़यांचे नुकसान झाले, जीवित हानी टळली.
आज सकाळी ६:३० ला खोपोली इंडिया स्टील च्या गलथानपणा मुळे अतिरिक्त असलेल्या भंगाराचा दबाव आणि पावसाच्या पाण्याचे व्यवस्तित निचरा होण्याचा मार्ग नसल्या मुळे भिंत कोसळून ६ फॉर व्हीलर गाड़यांचे नुकसान झाले .सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाहीं.
मुंबई – पुणे -एक्स्प्रेस वेवर टँकर ने घेतला पेट..
मुंबई – पुणे -एक्स्प्रेस वेवर मंगळवारी पुण्याहून मुंबई कडे कच्चे तेल घेऊन जाणाऱ्या टँकरला खोपोली येथील ढेकू गावा जवळ अचानक आग लागली .या अपघातात टँकरच्या केबिनला आग लागल्यामुळे चालकाचा आगीत होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला .अग्निशामक दलाने वेळीच आगीवर नियंत्रण मिळवले व आग आटोक्यात आणली त्यामुळे संपूर्ण टँकरने पेट न घेता मोठा अनर्थ टळला. जळलेल्या टँकर च्या […]